तुटीचा ‘बेस्ट’ अर्थसंकल्प पाठविला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:51 AM2019-01-19T05:51:40+5:302019-01-19T05:51:55+5:30

मुंबई पालिकेचा पवित्रा : २७ कोटींचे उत्पन्न बुडाल्याचा ठपका कामगारांवर

The 'Best' budget deficit was sent back | तुटीचा ‘बेस्ट’ अर्थसंकल्प पाठविला परत

तुटीचा ‘बेस्ट’ अर्थसंकल्प पाठविला परत

Next

मुंबई : शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्याचा प्रघात असल्याने बेस्ट उपक्रमाने २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा ७६९ कोटींच्या तुटीचा मांडलेला अर्थसंकल्प पालिकेच्या महासभेने नामंजूर करून फेरविचारासाठी पाठविला आहे.


महापालिका पालक संस्था असल्याने बेस्टच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी बंधनकारक आहे. पालिका अधिनियम १८८८ कलम १३६ नुसार हा अर्थसंकल्प शिलकीचा दाखवावा लागतो. बेस्ट उपक्रम डबघाईला आल्याने गेली तीन वर्षे तुटीचा अर्थसंकल्प महापालिकेपुढे सादर केला जातो. यापूर्वीचे सन २०१७-२०१८, २०१८-२०१९ चे अर्थसंकल्पही नंतर शिलकीचे दाखविल्यानंतरच मंजूर करण्यात आले होते. कृती आराखड्याची अंमलबजावणी रखडल्याने बेस्टची तूट भरून निघालेली नाही. त्यामुळे २०१९ -२० चा ७६९ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेने बेस्ट उपक्रमाची जबाबदारी उचलावी, अशी अपेक्षा होती. बेस्टच्या पालिकेतील विलिनीकरणाबाबत आता लवादासमोर चर्चा होणार आहे. या स्थितीत महासभेने नियमांवर बोट ठेवत अर्थसंकल्प फेटाळून लावल्याने पुन्हा सत्ताधारी शिवसेनेशी संघर्ष अटळ असल्याचे मानले जाते.

पगार कापण्याच्या हालचाली
संपकाळात बेस्टचे २७ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यात संपकऱ्यांना नऊ दिवसांचे वेतन दिले, तर हे नुकसान ४० कोटींवर पोहोचेल. म्हणून संपकºयांची नऊ दिवसांची रजा मंजूर न करता त्यांचा पगार कापल्यास नुकसान कमी होईल, असा प्रस्ताव बेस्टेने तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘बेस्ट’ची पगारवाढ शिवसेनेला खटकते!
च्बेस्ट कामगारांना सात हजार नव्हे, तीन हजारांची पगारवाढ मिळेल, असा दावा करत त्याचा पुरावा देण्याच्या शिवसेनेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी बेस्टच्या कर्मचाºयांना पगारवाढ मिळणार आहे, हेच शिवसेनेला खटकत असल्याचा टोला लगावला आहे.
च्संप काळात बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते शशांक रावांच्या आरोपांवर ब्रदेखील न काढणाºया शिवसेनेने आता त्यांच्याविरोधात आग ओकण्यास सुरुवात केली आहे.
च्संपाच्या काळात चर्चेतही नसलेल्या अनील परब यांना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोणते प्रस्ताव दिले होते, काय मुद्दे मांडले होते, याची कशी कल्पना असणार, असा प्रश्न करून त्या काळात परब कोठे होते, असा प्रश्न राव यांनी विचारला. आम्हाला पगारवाढीवर प्रश्न विचारणाºयांनी तेव्हा लेखी का दिले नाही, असा पलटवारही त्यांनी केला. बेस्टच्या कामगारांना घराबाहेर काढण्याच्या नोटिसा देणाºयांनी हे प्रश्न विचारू नयेत, अशी जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
च्बेस्टचे कामगार संपकाळातील नऊ दिवसांची रजा टाकतील आणि यापूर्वीही अशाच पद्धतीने रजा टाकण्यात आली होती. तशी ती मंजूर करावी, असे आवाहनही त्यांनी बेस्ट प्रशासनाला केले. आधी संपाला पाठिंबा देणाºयांनी नंतर तो मागे घेतल्यावरही कामगार हजर झाले नाहीत, याकडे लक्ष वेधत त्यांनी शिवसेनेला पुन्हा चिमटे काढले.
च्माझ्या भाषणाची स्क्रिप्ट कोणी लिहिली होती, हे अनील परब यांना माहीत असेलच, असा तिरकस टोलाही राव यांनी लगावला.
च्न्यायालयाच्या आदेशानेच संप मागे घेण्यासाठी सभा घेतली आणि त्यात निर्णय घेऊन तसे न्यायालयाला कळवले. त्यामुळे संप मागे घेण्याबाबत परब यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. राव यांनी नऊ दिवस मुंबईकरांना वेठीस धरले. यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडले.

Web Title: The 'Best' budget deficit was sent back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.