विनातिकीट प्रवाशांकडून मे महिन्यात साडेचौदा कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 05:01 AM2019-06-22T05:01:04+5:302019-06-22T05:01:29+5:30

२८७ जणांना कोठडी; पश्चिम रेल्वे प्रशासनाची कारवाई

Benchmark tribunals sentenced to 7.5 million crores of rupees in May | विनातिकीट प्रवाशांकडून मे महिन्यात साडेचौदा कोटींची दंडवसुली

विनातिकीट प्रवाशांकडून मे महिन्यात साडेचौदा कोटींची दंडवसुली

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरून मे महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १४ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवासी आणि अनधिकृतरीत्या सामान घेऊन प्रवास करणाºया प्रवाशांविरोधात तब्बल २ लाख ८७ हजार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरून मे महिन्यांत ३३८ गर्दुल्ले आणि ९१९ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये काहींना दंड वसूल करून सोडण्यात आले, तर २८७ जणांना कोठडी सुनावली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील अनधिकृत तिकीट दलालांविरोधात रेल्वे प्रशासनाची मोहीम सुरू आहे. मे महिन्यांत २१८ प्रकरणांची चौकशी करून २०५ तिकीट दलालांना पकडण्यात आले आहे, तर आरक्षित तिकीट अनधिकृतरीत्या विकणाºया १४ जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १६ हजार ५० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी होणार वापर
प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, या उद्देशाने तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. जे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात, त्यांना आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी या दंडाच्या रकमेचा वापर केला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत २४.०१ टक्के वाढ झाली आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Web Title: Benchmark tribunals sentenced to 7.5 million crores of rupees in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.