Join us  

मान्सूनच्या परतीला सुरुवात; मुंबईतही लवकरच सॅन्डॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 12:31 PM

महाराष्ट्रात १७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद

ठळक मुद्देमहाराष्ट्रात १७ टक्के अधिक पाऊस मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस

मुंबई : राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला असतानाच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात चार महिन्यात मान्सूनची ९९५.३ मिमी नोंद होते. यावर्षी १ हजार १६३.५ मिमी पाऊस कोसळला असून, अधिकच्या पावसाने महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता उर्वरित राज्यात मान्सूनने ब-यापैकी सरासरी ओलांडली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानतून आपला परतीचा प्रवास सुरु करतो. मात्र यावर्षी तब्बल ११ दिवस विलंबाने मान्सूनने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. येत्या ४८ तासांत मान्सून हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून परतीचा प्रवास सुरु करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक  राहणार आहे. मुंबईत देखील मान्सूनला गुड बाय करण्याची वेळ आली असून, आता परतीच्या पावसाचे वातावरण येथे तयार होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. --------------------

विभागावर अधिक पाऊस टक्क्यांतकोकण गोवा २८मध्य महाराष्ट्र ३०मराठवाडा ३१विदर्भ १० टक्के तूट-------------------

जिल्हानिहाय अधिक पाऊस टक्क्यांतमुंबई शहर २३मुंबई उपनगर ९३ठाणे २४रायगड ११रत्नागिरी ११सिंधुदुर्ग १४५कोल्हापूर ४७सांगली ६०सातारा ३०पुणे ४७नाशिक ३०नंदुरबार १६धुळे ५५औरंगाबाद ३८अहमदनगर १०२उस्मानाबाद ५०लातूर ८३बीड ५१परभणी ७६जालना ४७जळगाव २९बुलडाणा १४वाशिम ४१हिंगोली ३५नांदेड ४५-------------------

तूट : जिल्हानिहाय पाऊस टक्क्यांतसोलापूर ५अकोला २५अमरावती १५यवतमाळ ४वर्धा ५नागपूर २५चंद्रपूर ४७भंडारा ७०गोंदिया ५९गडचिरोली २१पालघर ३०-------------------

मान्सूनच्या परतीच्या तारखा (ऑक्टोबर)जळगाव ६नागपूर ६मुंबई ८अहमदनगर ८सातारा ९कोल्हापूर ११पुणे ११

 

टॅग्स :पाऊसमानसून स्पेशलमुंबई मान्सून अपडेटहवामान