Join us

अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 18:35 IST

Return of the monsoon : मुंबई आणि ठाण्याला पावसाचा इशारा

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसांत मुंंबई, ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या परतीचा प्रवास  वेगाने सुरु झाला असून, मंगळवारी राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेशाचा काही भाग, मध्य प्रदेशाच्या काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

गेल्या २४ तासांतील माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ९ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १० ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर मुंबई कोरडी होती. दुपारी तर अक्षरश: मुंबईकरांना ऊन्हाचा तडाखा बसत होता. दुपारी किंचित ऊकाड्याचा त्रास झाल्याचे मुंबईकरांना जाणवले. सायंकाळ रात्री देखील किंचित सर्वसाधारण अशीच परिस्थिती होती.

 

टॅग्स :पाऊसमुंबईमानसून स्पेशलहवामान