‘शाहरुख भाई के आदमी है’ म्हणत पोलिसांना मारहाण; मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:48 IST2024-04-16T05:47:21+5:302024-04-16T05:48:10+5:30
वांद्रे परिसरात सिगारेट, दारूची नशा करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी पोलिसांना मारहाण केली.

‘शाहरुख भाई के आदमी है’ म्हणत पोलिसांना मारहाण; मुंबईतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे परिसरात सिगारेट, दारूची नशा करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी पोलिसांना मारहाण केली. ‘शाहरूख भाई के आदमी है’ म्हणत त्यांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
बॅन्डस्टँड परिसरात काही जण शनिवारी रात्रीच्या सुमारास दारू पित शिवीगाळ करत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांना हटकताच त्यांनी पोलिसांना दमदाटी केली. ‘हम शाहरूख भाई के आदमी है, तुमको दिखाते है, हम क्या है’, असे बोलून धक्काबुक्की केली.