नवीन वर्षात ‘या’ सायबर गुन्ह्यांपासून राहा सावध! सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:32 IST2024-12-30T15:32:38+5:302024-12-30T15:32:55+5:30

सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजे आहे, असे सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांनी सांगितले. 

Be careful of these cyber crimes in the new year! Cybercrime lawyer Dr. Prashant Mali appeals | नवीन वर्षात ‘या’ सायबर गुन्ह्यांपासून राहा सावध! सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांचे आवाहन 

नवीन वर्षात ‘या’ सायबर गुन्ह्यांपासून राहा सावध! सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांचे आवाहन 

मुंबई : जसजसे डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. २०२५ मध्ये या गुन्ह्यांचे स्वरूप बदलत असले तरी नागरिकांनी योग्य सावधगिरी बाळगल्यास या आव्हानांवर मात करता येईल. सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजे आहे, असे सायबर क्राइम क्षेत्रातील वकील डॉ. प्रशांत माळी यांनी सांगितले. 

डीप फेक व्हिडीओ, डेटा चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा 
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर
सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग करून फिशिंग, स्पुफिंग आणि डीपफेक व्हिडीओ तयार करतील, ज्यामुळे खोट्या गोष्टी अधिक विश्वासार्ह वाटतील.

- आरोग्याशी संबंधित डेटा चोरी
स्मार्ट डिव्हायसेस आणि आरोग्यसेवा ॲप्समधून वैयक्तिक आरोग्य डेटा चोरीला जाईल, ज्याचा उपयोग ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो.

- क्रिप्टोकरन्सीशी संबंधित फसवणूक
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट गुंतवणूक योजनांद्वारे फसवणूक वाढेल.
- इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) 
उपकरणांचे हॅकिंग
स्मार्ट होम आणि कनेक्टेड 
उपकरणांच्या वापरामुळे त्यांचे हॅकिंग करून गोपनीय माहिती चोरीला जाण्याचा धोका वाढेल.

- पर्सनल आयडेंटीटी डेटा (पीआयडी) चोरी
डेटा ब्रिचच्या घटनांमुळे वैयक्तिक ओळख चोरीचे 
प्रकार वाढतील, ज्याचा वापर कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा इतर फसवणुकीसाठी होईल.

अशी घ्या काळजी... -
मजबूत पासवर्ड आणि २-स्टेप ऑथेंटिकेशन वापरा : सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा आणि दुहेरी प्रमाणीकरण प्रणाली वापरा.
संशयास्पद लिंक्स, ई-मेल टाळा : अनोळखी व्यक्तींचे ई-मेल, मेसेजमधील लिंक्स उघडू नका.
डेटा, उपकरणे नियमितपणे अपडेट करा : स्मार्टफोन, लॅपटॉप आणि आयओटी डिव्हायसेसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.
सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या : व्हीपीएनचा वापर करून सुरक्षित ब्राउजिंग सुनिश्चित करा.
वित्तीय व्यवहारांसाठी केवळ अधिकृत ॲप्स वापरा : बँकिंग किंवा खरेदीसाठी फक्त बँक किंवा अधिकृत प्रदात्यांचे ॲप्स वापरा.
सायबर सुरक्षिततेबाबत जागरूक राहा : फसवणूक होण्यापूर्वी सायबर गुन्ह्यांच्या तंत्रांचा अभ्यास करा आणि सतर्क राहा.
 

Web Title: Be careful of these cyber crimes in the new year! Cybercrime lawyer Dr. Prashant Mali appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.