बीडीडी चाळ : पुनर्विकासातील अडथळे दूर करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:48 AM2020-09-05T04:48:07+5:302020-09-05T04:48:41+5:30

या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी उपस्थित होते.

BDD Chawl: Remove Obstacles to Redevelopment - CM | बीडीडी चाळ : पुनर्विकासातील अडथळे दूर करा - मुख्यमंत्री

बीडीडी चाळ : पुनर्विकासातील अडथळे दूर करा - मुख्यमंत्री

Next

 मुंबई : वरळी येथे बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका बैठकीत दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या
या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार
सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी उपस्थित होते.
वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने तातडीने पाऊले उचला असे मुख्यमंत्री म्हणाले. रहिवाशांची पात्रता तपासण्यासाठी महसूल विभागाकडून आवश्यक उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणी सांगितल्या. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत नियमित आढावा घ्यावा अशीही मुख्यमंत्र्यांनी सूचना केली.

ना. म. जोशी मार्ग येथे ३२ चाळी असून २५०० भाडेकरू आहेत तर नायगाव येथे ४२ चाळी आणि ३३०० भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी तसेच भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: BDD Chawl: Remove Obstacles to Redevelopment - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.