Join us

Baramati Lok Sabha : शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 19:54 IST

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात  खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात  खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी शरद पवार माध्यमांसोबत बोलताना  मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावर आता पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांनी आधी स्टेटमेंट केलं, यावर पत्रकारांनी प्रश्न केला त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे दोन शब्दात उत्तर दिलं. शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही, शरद पवार यांना संपवण्यासाठी ही निवडणूक आहे. यामुळे आता त्यांच्याकडे दुसर काहीच नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

"आमचे विरोधक  शरद पवार यांच्याविरोधात अजून काय षडयंत्र करतात हे बघायला पाहिजे, त्या का रडल्या असतील हे त्यांनाच विचारायला पाहिजे. शरद पवार फार काही मोठं बोलले नाही, अजित पवार माझ्याविरोधात रोजच बोलतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अजित पवार काय म्हणाले होते?

बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी सुप्रिया सुळे याच मूळ पवार असून सुनेत्रा पवार तर बाहेरून आल्या असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं. शरद पवार काय म्हणाले होते?

बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. यावर  "शरद पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार", यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

टॅग्स :सुप्रिया सुळेसुनेत्रा पवारशरद पवारलोकसभा निवडणूक २०२४