बाप्पा पावला; मान्सूनचे जोरदार पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 03:12 AM2019-09-01T03:12:57+5:302019-09-01T03:13:17+5:30

मुंबई, उपनगरात दमदार । मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगडमध्ये तुफान फटकेबाजी

Bappa was born; Vigorous comeback of the monsoon | बाप्पा पावला; मान्सूनचे जोरदार पुनरागमन

बाप्पा पावला; मान्सूनचे जोरदार पुनरागमन

Next

मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, गणेशोत्सवाच्या प्रारंभीच मान्सूनने मुंबापुरीत जोरदार आगमन केले आहे. सोमवारी लाडक्या बाप्पाचे आगमन होत असतानाच, शुक्रवारी रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात जोरदार कोसळत मान्सूनने दमदार पुनरागमन केले. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून, कोसळत असलेल्या सलग सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून किंचितसा का होईना, दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, देशभरात २५ जुलैपासून १९ आॅगस्टपर्यंत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. ६ ते १० आॅगस्टदरम्यान पावसाची नोंद अधिक असून, आतापर्यंत देशभरात १०१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ३१ आॅगस्टपर्यंतच्या पावसाच्या नोंदी पाहिल्यास देशातील ७ उपविभागांत अतिरिक्त पावसाची, तर २२ उपविभागात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. ७ उपविभागात उणे म्हणजे अपुरा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा विचार करता ३ जिल्ह्यांत अतिरिक्त पावसापेक्षा अधिक पावसाची, ११ जिल्ह्यांत अतिरिक्त पावसाची, तर ११ जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस नोंदविण्यात आला आहे. याशिवाय १० जिल्ह्यांत उणे म्हणजे अपुरा पाऊस नोंदविण्यात आला. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूरमध्ये अपुरा पाऊस
च्पुणे, नाशिक आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत अतिरिक्त पावसापेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
च्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि धुळे या जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊस नोंदविण्यात आला आहे.
च्अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि नांदेड या जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस नोंदविण्यात आला आहे.
च्सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उणे म्हणजे अपुरा पाऊस पडला आहे.

राज्यासाठी अंदाज
१ ते २ सप्टेंबर : कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बºयाच ठिकाणी पाऊस पडेल.
३ ते ४ सप्टेंबर : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.

तलाव क्षेत्र पावसाची एकूण
नोंद मिलीमीटरमध्ये
(कंसात वापरायोग्य पाणी टक्क्यांत)
अप्पर वैतरणा ३,३७८ (९२)
मध्य वैतरणा ३,२७६ (९८)
मोडक सागर ३,५३३ (९५)
तानसा ३,१९१ (९९)
भातसा ३,३४२ (९८)
तुळशी ३,८५६ (१००)
विहार ३,१०९ (१००)

मुंबईत आकाश राहणार ढगाळ
१ आणि २ सप्टेंबर : शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

आतापर्यंतच्या पावसाची नोंद
(टक्केवारीत)
मध्य भारत - ११३
दक्षिण भारत - १०६

Web Title: Bappa was born; Vigorous comeback of the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.