Join us

बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:53 IST

मुंबईतील मिरी रोड येथील घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क मिरा रोड : भाईंदरच्या एका बँकेची ७५ लाखांना फसवणूक करून मुख्य आरोपी राजपत्रात सहजपणे आडनाव बदलून गेली ९ वर्षे उजळ माथ्याने व्यावसायिक म्हणून आलिशान जीवन जगत कुटुंबासह नालासोपाऱ्यात राहत होता. मात्र, मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने त्या आरोपीच्या शनिवारी मुसक्या आवळून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. 

भाईंदर पश्चिम येथे कॅथलिक सिलियन बँक लिमिटेडची शाखा आहे. २०१२ ते २०१६ काळात बँकेत नकली सोने तारण ठेवून त्यावेळी मिरा रोडमध्ये राहणाऱ्या गोपाल राधेश्याम नाग (वय ४२) याने बँकेकडून ७५ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली होती. भाईंदर पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये नागसह ६ जणांवर गुन्हा दाखल झाला. नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून नाग बिळात लपून बसला होता. ९ वर्षे फरार नाग हा जवळच्याच नालासोपारा भागात वावरत होता. याचा पोलिसांना थांगपत्ता नव्हता. 

टॅग्स :गुन्हेगारीमहाराष्ट्रमुंबई