वांद्रे स्थानकावरील उंदरांचा 'तो' स्टॉल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 09:38 PM2019-03-30T21:38:22+5:302019-03-30T21:40:55+5:30

वांद्रे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ वरील स्टॉलवर पाण्याच्या बाटल्या, इतर खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ एका प्रवाशाने टिष्ट्वटरवर पोस्ट केला.

Bandra station stall closed after rat video goes viral | वांद्रे स्थानकावरील उंदरांचा 'तो' स्टॉल बंद

वांद्रे स्थानकावरील उंदरांचा 'तो' स्टॉल बंद

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने हा स्टॉल बंद केला. 


वांद्रे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ वरील स्टॉलवर पाण्याच्या बाटल्या, इतर खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ एका प्रवाशाने टिष्ट्वटरवर पोस्ट केला. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलून स्टॉल बंद केला. 
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकावरील लिंबू सरबताचे प्रकरण ताजे असताना पश्चिम रेल्वे मार्गावरील उंदीर फिरण्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील स्टॉलवरील खाद्यपदार्थाचा दर्जावर खालावलेला असल्याचे दिसून येत आहे.

अशा घटनामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने तातडीने स्टॉल प्रकरणावर पावले उचलणे आवश्यक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

Web Title: Bandra station stall closed after rat video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.