Join us  

चिनी अ‍ॅपवर बंदी घालणं योग्यच, पण टिक-टॉकवरील बंदीमुळे...; संजय निरुपम यांची वेगळीच खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 1:25 PM

ते म्हणाले की, हा निर्णय योग्य असला तरी टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे देशातील लाखो तरुण बेरोजगार होतील.

मुंबईः महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते संजय निरुपम यांनी भारत सरकारनं टिकटॉकसह चीनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयावर अजब प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हा निर्णय योग्य असला तरी टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे देशातील लाखो तरुण बेरोजगार होतील. मंगळवारी त्यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे.ट्विटमध्ये संजय निरुपम यांनी लिहिले आहे की, "चिनी अॅप्सवर बंदी आणणे हा योग्य निर्णय आहे. परंतु टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे आपल्या देशातील कोट्यवधी तरुण बेरोजगार होतील. या कालावधीतील स्वस्त, शुद्ध आणि घरगुती करमणुकीपासून आपण वंचित राहू. टिक टॉक स्टार्सचा अचानक अंत होणं ही शोकांतिका आहे. त्यांच्या अफाट प्रतिभेला नम्र आदरांजली, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. डेटा चोरीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या अॅप्सवर बंदी घातली आहे. आयटी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अँड्रॉईड व आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही मोबाइल अ‍ॅप्सचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी विविध लोकांकडून आल्या आहेत. ही अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चोरतात आणि त्यांची गोपनीय माहिती अनधिकृतपणे भारताबाहेर पाठवतात, असंही केंद्राचं म्हणणं आहे. गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्रानेही अशा अ‍ॅप्सवर व्यापक बंदी घालण्याची शिफारस केली आहे. अलीकडे अशी अॅप्स भारताच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडतेसाठी धोकादायक असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे भारत सरकारने मोबाइल आणि गैर-मोबाइल इंटरनेट सक्षम उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या काही अ‍ॅप्सना बंद केली आहेत. तसेच त्या ऍप्सचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

देशभरात चिनी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!

चीनचे ५९ अ‍ॅप बंद केल्यानं काय बदलणार अन् भारताला कसं नुकसान होणार?, जाणून घ्या...

पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार

बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...

टॅग्स :संजय निरुपम