माझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:12 IST2018-11-14T20:11:57+5:302018-11-14T20:12:09+5:30
शाळेत असताना मी फारच खोडकर होतो, शाळेत प्रचंड दंगा करायचो, असं राज ठाकरे एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

माझ्या प्रगतिपुस्तकावर बाळासाहेबच सही करायचे- राज ठाकरे
मुंबई- शाळेत असताना मी फारच खोडकर होतो, शाळेत प्रचंड दंगा करायचो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या ''ऐसपैस गप्पा राजकाकांशी'' या कार्यक्रमात त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, बालपण म्हटलं की मला पहिल्यांदा बालमोहनची शाळा आठवते. शाळेत बालदिनाला बैलगाडीत बसवून शिवाजी पार्कला मिरवणूक निघायची, उसाची दांडी खायला द्यायचे, तेव्हा फारच मज्जा यायची.
शाळेत असताना सर्वात जास्त भीती अभ्यासाची वाटायची. मराठी, इतिहास, भूगोल आणि हिंदी आवडते विषय असले तरी चित्रकला हा विषय सर्वाधिक आवडायचा. आई-वडिलांना प्रगतिपुस्तक दाखवायचो नाही, चौथीनंतर केवळ बाळासाहेबच सही करायचे, असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला आहे. पूर्वी वर्गातले मित्र स्वरराज अशी हाक मारायचे, आता तेही बंद झालं. स्वरराज या नावाने मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढायचो.
दहावीत मला फक्त 37 टक्के मिळाले होते. त्यामुळे अभ्यासाऐवजी व्यंगचित्रांकडे वळलो. व्यंगचित्रकार होणं ही चित्रकलेतील शेवटची स्टेप आहे. शाळेत वक्तृत्व स्पर्धेतही कधी भाग घेतला नव्हता, माणसं बघितली की थरथर कापायचो, असंही राज टाकरे म्हणाले आहेत. वर्गशिक्षिका सावे बाईंना वडील श्रीकांत ठाकरे यांनी 1978 साली लिहिलेलं पत्र राज ठाकरेंनी यावेळी वाचून दाखवलं.