Join us

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 12:07 IST

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत.

ठळक मुद्देहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (शनिवारी) सहावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून  मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मृतिस्थळाला भेट देऊन सहकुटुंब बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 

 

 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनामुंबईउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस