विदेशात नोकरीचे आमिष; २.६४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:37 IST2025-07-14T09:37:14+5:302025-07-14T09:37:35+5:30

भाविकाने त्यांचे कंपनीशी संलग्न असलेल्या परदेशातील कंपनीने त्यांना ऑफर लेटर दिल्यानंतर पुन्हा संपर्क करेन, असे सांगितले.

Bait of job abroad; fraud of Rs 2.64 lakh | विदेशात नोकरीचे आमिष; २.६४ लाखांची फसवणूक

विदेशात नोकरीचे आमिष; २.६४ लाखांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : घाटकोपरमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या २५ वर्षांच्या तरुणाला विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची २.६४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, तक्रारदार नील (२५) हा १ जूनला गुगलवर जॉब शोधत असताना एका  कंपनीचा फोन नंबर दिसला. नीलने त्यांच्याशी संपर्क साधला असता भाविका गोयल नावाच्या महिलेने त्याला परदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्याकरिता लागणारा व्हिजा आणि इतर सर्व कामे कंपनीकडून करून देतो, असे सांगितले. 

कॅनडातील कंपनीचे जॉब लेटर 
भाविकाने त्यांचे कंपनीशी संलग्न असलेल्या परदेशातील कंपनीने त्यांना ऑफर लेटर दिल्यानंतर पुन्हा संपर्क करेन, असे सांगितले. ४ जूनला भाविकाने व्हॉट्सॲप नंबरवरून कॅनडा येथील नामांकित कंपनीचे एक जॉब लेटर पाठविले.  काही दिवसांनी कंपनीचे लेटरहेड मिळाले. पुढे काही वेगवेगळी करणे पुढे करत पैशांची मागणी सुरू केली. मात्र, २.६४ लाख रुपये भरूनही ३० जूनला बँकेच्या लेटरहेडवरील पत्र पाठवत २,५०० कॅनेडियन डॉलर कॅनडातील बँकेत खाते चालू करण्यास भरावे लागतील, असे सांगितले. 

असा झाला प्रकार उघड
पत्राची खात्री करण्यासाठी नील जवळच्या बँकेत गेला असता बँक असे कोणालाही पत्र देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर २ जुलैला नीलने ‘त्या’ कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांनी सर्व चुकीचे असल्याचे सांगितले. तेव्हा फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्याने पैसे करत करण्यास तगादा लावला. अखेर, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

Web Title: Bait of job abroad; fraud of Rs 2.64 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.