महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:03 IST2025-10-21T06:03:42+5:302025-10-21T06:03:42+5:30
अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला. अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता.

महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महसूल विभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा अनुशेष येत्या तीन महिन्यांत भरून काढला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले.
बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यात २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती दिली आहे. यातील अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला. तसा शासन निर्णयही जारी केला आहे. अनेक वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता.
यापूर्वी, सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात, बावनकुळे यांनी १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता. यातील ८० जण अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले. आता तहसिलदार ते उपजिल्हाधिकारी यांची पदोन्नती तसेच नव्याने उपजिल्हाधिकारी यांची पदे एमपीएससी मार्फत भरण्याची तयारी सुरू आहे.