Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 13:44 IST

Ayodhya Verdict 2019 : राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे

मुंबई - अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. राम मंदिराचा आज निर्णय आला यातून सर्वात एक गोष्ट जाणविली की आज बाळासाहेब हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. इतके वर्ष जो संघर्ष झाला त्या संघर्षाची चीज झालं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंद झाला. जे कारसेवकांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळणार का? हा इतकी वर्ष प्रश्न होता तो आज निकाली लागला असं त्यांनी सांगितले. 

जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये - सरसंघचालकहे प्रकरण अनेक दशकांपासून चालू होते आणि ते योग्य निष्कर्षावर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये, भूतकाळात जे घडलं ते विसरुया आणि पुन्हा एकत्र येऊ, समाजात शांतता अन् सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करुयात असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

हा महत्त्वाचा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल - अमित शहामला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि महान संस्कृती आणखी बळकट होईल. श्री रामजन्मभूमी कायदेशीर वादासाठी प्रयत्नशील; संपूर्ण देशातील संत संस्था आणि बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न केलेल्या असंख्य अज्ञात लोकांबद्दल मी त्यांचे आभार मानतो - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

या निकालामुळे रामाचा वापर राजकारणासाठी थांबेल - काँग्रेसअयोध्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे. आम्हीदेखील राम मंदिर निर्माणाच्या बाजूने आहोत. या निकालाने मंदिर बनविण्याचं दार उघडलं गेलं मात्र या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्यांचे दार बंद झालं अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.  

टॅग्स :अयोध्याराम मंदिरबाळासाहेब ठाकरेराज ठाकरेसर्वोच्च न्यायालय