देव प्रशालेत शोभायात्रेतून जागृती

By Admin | Updated: June 6, 2015 22:57 IST2015-06-06T22:57:08+5:302015-06-06T22:57:08+5:30

महिला शिक्षण समितीच्या वतीने पेणमध्ये चालविण्यात येणाऱ्या सुमतीबाई वि. देव प्रशालेने शनिवारी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

Awakening from God School of Shobhayatra | देव प्रशालेत शोभायात्रेतून जागृती

देव प्रशालेत शोभायात्रेतून जागृती

पेण : महिला शिक्षण समितीच्या वतीने पेणमध्ये चालविण्यात येणाऱ्या सुमतीबाई वि. देव प्रशालेने शनिवारी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिक्षण संस्थेच्या शिशू विकास मंदिर इंग्रजी नर्सरी, देव पूर्व प्राथमिक-माध्यमिक व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शोभायात्रेत इंद्रधुनष्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविधरंगी टी शर्ट परिधान केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी, मराठी शाळा वाचवा... मुलींना शाळेत पाठवा..., झाडे लावा... झाडे जगवा... पर्यावरणाचे रक्षण करा... वृक्षवल्ली आम्हा सोयरी.. आदी घोषणा दिल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी गाणी गायली.
मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढवा, परिसर स्वच्छता या समाजोपयोगी संदेशाव्दारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. लेझीम झांज पथक संस्थेचे बॅनर व सरस्वती तथा विद्यादेवीचा चित्ररथ असा नावीण्यपूर्ण साजशृंगार शोभायात्रेत अवतरला होता. सुवर्णवर्ष महोत्सवाचा प्रारंभ शोभायात्रेतून सबंध पेण शहरात रॅली फिरून जल्लोषात झाला. उद्घाटनाचा श्रीफळ संस्था अध्यक्षा सुहासिनी देव यांच्या हस्ते वाढविण्यात आला. रॅलीत माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते.

Web Title: Awakening from God School of Shobhayatra