रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे, शशांक राव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:24 PM2019-07-08T22:24:20+5:302019-07-08T22:41:25+5:30

मंगळवारपासून होणारा  रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. 

autorickshaw drivers strike back | रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे, शशांक राव यांची घोषणा

रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे, शशांक राव यांची घोषणा

Next

मुंबई - मंगळवारपासून (आज मध्यरात्रीपासून) होणारा  रिक्षाचालकांचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर कामगार नेते शशांक राव यांनी हा संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. 

 

रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा आदी मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने ९ जुलै रोजी संपाची हाक दिली  होती.  या संपात मुंबईठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार होते.

९ जुलै रोजी होणाऱ्या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये लालबावटा रिक्षा युनियन डोंबिवली, स्वाभिमान टॅक्सी संघटना यांचा समावेश होता, तर रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेने या संपास विरोध केला  होता.

Web Title: autorickshaw drivers strike back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई