ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:29 AM2024-02-03T10:29:20+5:302024-02-03T10:31:32+5:30

१६५० तक्रारी प्राप्त; ६५४ परवाने निलंबित.

Autorickshaw and taxi licenses are suspended of regional transport department | ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर

मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जास्त भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास ती व्हॉट्सअॅप क्रमांकावर करता येणार आहे. त्यासाठी ९१५२२४०३०३ क्रमांक व mh03autotaxicomplaint@g mail.com ई-मेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध आतापर्यंत १६५० तक्रारी प्राप्त झाल्या असून, ६५४ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तब्बल ६०४ तक्रारी ऑटोरिक्षाशी संबंधित :

• व्हॉट्सअॅप व ई-मेल आयडीवर ११ जुलै २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत १६५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

• संबंधित कार्यालयाशी निगडित ७१७ तक्रारी आहेत.

• त्यापैकी ६०४ तक्रारी या ऑटोरिक्षा व ११३ तक्रारी या टॅक्सी सेवेशी संबंधित आहेत.

● या तक्रारींमध्ये ५४० तक्रारी 3 ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, ५२ तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे  व १२५ तक्रारी प्रवाशांची गैरवर्तन करण्याबाबत प्राप्त झाल्या आहेत.

● दोषी आढळलेल्या एकूण ६५४ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यापैकी ५०३ परवानाधारकांचे भाडे नाकारणे यासाठी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

८० प्रकरणांत २ लाखांचा दंड :

■ या कारवाईत ५८ वाहनधारकांकडून १ लाख ४५ हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत.

• तसेच १०५ परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, ४६ परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या पेक्षा जादा भाडे परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.

■ या सर्व प्रकारांमध्ये एकूण ८० प्रकरणात २ लाख रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

Web Title: Autorickshaw and taxi licenses are suspended of regional transport department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.