Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: घाटकोपरमध्ये दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा प्रयत्न; रहिवाशांच्या सतर्कतेमुळे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:32 IST

Mumbai Child Safety Alert: सोसायटीतील रहिवासी मोहम्मद जकारिया शमसी (२१) यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. 

मुंबई : दामोदर पार्क परिसरातील मैत्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री ९ वाजता दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. सोसायटीतील रहिवासी मोहम्मद जकारिया शमसी (२१) यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारातील गार्डनमध्ये काही लहान मुले खेळत असताना अनोळखी व्यक्ती तेथे आली. ताे सात वर्षांच्या मुलीला ओढत नेत हाेता. तसेच आणखीन मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न करत असताना शमसी याने संशयिताला जाब विचारला. त्यावेळी दोन्ही मुलींना सोडून पळू लागला. मात्र शमसी यांनी अयान खान आणि तहा शेख यांच्या मदतीने त्याला पकडले.  चौकशीदरम्यान संबंधित इसमाने आपले नाव सरजूप्रसाद केशुलाल बनवासी (३४) असे सांगितले. 

तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने सोसायटीत येण्याचे समाधानकारक कारण न दिल्याने रहिवाशांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnap attempt foiled in Ghatkopar; alert residents apprehend suspect.

Web Summary : In Ghatkopar, Mumbai, residents thwarted an attempt to kidnap two young girls. Alertness of a resident led to the capture of the suspect, Sarjuprasad Keshulal Banwasi, originally from Madhya Pradesh. Police are investigating the incident.
टॅग्स :गुन्हेगारीपोलिसअपहरणघाटकोपर