राज्य सरकारकडून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न, रविवारी मुंबईभर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:14 AM2020-09-18T03:14:47+5:302020-09-18T06:30:52+5:30

मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Attempt by the state government to evict the Maratha community, agitation across Mumbai on Sunday | राज्य सरकारकडून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न, रविवारी मुंबईभर आंदोलन

राज्य सरकारकडून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न, रविवारी मुंबईभर आंदोलन

Next

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती आदेशानंतर राज्य सरकारचे निर्णय आणि कृती मराठा समाजाला डिवचणारी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही समाज शांत होता, संयमाने व्यक्त होत होता. तरीही राज्य सरकारने अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबविण्याचा, पोलीस भरतीचा निर्णय घेतला. मराठा विद्यार्थी आणि तरुणांवर अन्याय करण्याची सरकारची भूमिका आहे. आरक्षणासह या सर्व प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय न झाल्यास रविवारी मुंबईभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला.
मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार, अंकुश कदम आदींनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

Web Title: Attempt by the state government to evict the Maratha community, agitation across Mumbai on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.