सिगारेट ओढण्यास सोबत आला नाही म्हणून मित्राच्या हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:16 AM2018-12-15T01:16:13+5:302018-12-15T01:16:30+5:30

सिगारेट ओढण्यासाठी सोबत आला नाही म्हणून जीवलग मित्रानेच मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पवईत घडली.

The attempt of the murder of a friend so as not to accompany the cigarette | सिगारेट ओढण्यास सोबत आला नाही म्हणून मित्राच्या हत्येचा प्रयत्न

सिगारेट ओढण्यास सोबत आला नाही म्हणून मित्राच्या हत्येचा प्रयत्न

Next

मुंबई : सिगारेट ओढण्यासाठी सोबत आला नाही म्हणून जीवलग मित्रानेच मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पवईत घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी, नूर गुलामविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आयुष राजभर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साकीविहार रोड परिसरात आयुष राधेशाम राजभर (१८) कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच परिसरात मित्र नूर गुलाम राहतो. दोघेही एकमेकांना सिगारेटसाठी पैसे देतात. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नूरने नेहमीप्रमाणे आयुषला सोबत सिगारेट ओढण्यासाठी बोलावले. मात्र आयुषने त्याला नकार दिला. नूरला राग आला. तरीही आयुषचा नकार कायम होता. याच रागात नूरने त्याला शिवीगाळी सुरू केली. पुढे हाताने मारहाण केली. आयुषने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करताच, नूरने त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. आयुषच्या काकाने बचावासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तेही यात जखमी झाले.

Web Title: The attempt of the murder of a friend so as not to accompany the cigarette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.