महिला कॉन्स्टेबलवर मालवणीत हल्ला, दोन आरोपींना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:26 IST2025-01-24T12:23:02+5:302025-01-24T12:26:13+5:30

नाकाबंदीदरम्यान मालवणी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. पंकज गुप्ता आणि दीपक राठोड, अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Attack on female constable in Malvani, two accused arrested | महिला कॉन्स्टेबलवर मालवणीत हल्ला, दोन आरोपींना केली अटक

महिला कॉन्स्टेबलवर मालवणीत हल्ला, दोन आरोपींना केली अटक

मुंबई -  नाकाबंदीदरम्यान मालवणी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. पंकज गुप्ता आणि दीपक राठोड, अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. हल्ल्याआधी आरोपींचे कांदिवलीतील एका बारमध्ये काही कारणावरून तिसऱ्या व्यक्तीसोबत वाद झाला होता.

दोन आरोपींना केली अटक
आरोपी त्याचा पाठलाग करत चारकोपच्या  तीन स्मशानभूमी येथे नाकाबंदी परिसरात आले. तिथे त्यांनी त्याला अडवत भांडण सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. 
पोलिसांशीच त्यांनी हुज्जत घातली. ते पाहिल्यावर महिला पोलिस कॉन्स्टेबलने मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्या रागात आरोपींनी त्यांच्या हातावर हल्ला केला. त्यांना गंभीर दुखापत झाली असून, मालवणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  

 

Web Title: Attack on female constable in Malvani, two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.