Video : वय वर्ष केवळ १४, धारावीतून निघून इंटरनॅशनल लक्झरी ब्रँडचा चेहरा बनली स्लम प्रिन्सेस मलिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 15:19 IST2023-05-23T15:18:46+5:302023-05-23T15:19:25+5:30
आता तिच्याकडे हॉलिवूडच्या चित्रपटांच्याही ऑफर्स आहेत.

Video : वय वर्ष केवळ १४, धारावीतून निघून इंटरनॅशनल लक्झरी ब्रँडचा चेहरा बनली स्लम प्रिन्सेस मलिशा
मुंबई : धारावीत राहणाऱ्या १४ वर्षीय मलिशा खारवा या मुलीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. मलिशाची सौंदर्य प्रसाधन असलेल्या एका ब्रँडच्या नव्या कँपेनचा द युवती कलेक्शनचा नवा चेहरा म्हणून निवड झाली आहे. मलिशा हिला स्लम प्रिन्सेस असे म्हटले जात असून, तिच्याकडे हॉलिवूडच्या अनेक ऑफरही आहेत.
परिस्थिती कशीही असो तुम्ही मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे स्वतःला झोकून द्या, असे मलिशाने यावर म्हटले असून, तिने अनेक मॉडेलिंगची कामे केली आहेत. तिने लिव्ह युवर फेयरीटेल या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. आता तिला सौंदर्य प्रसाधन असलेल्या एका ब्रँडच्या मोहिमेची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लाइक्सचा पाऊस
इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये मलिशा स्टोअरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद अवर्णीय आहे. व्हिडीओला चार लाखांहून अधिक लाइक्स RDR मिळाले आहेत.
धारावी आणि हॉलिवूड
धारावीतल्या मलिशा खारवा हिची निवड हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन याने २०२० साली केली होती. गाण्याच्या शूटिंगसाठी ते एकदा मुंबईत आल्यावर मलिशाचा शोध लागला. तिने दोन हॉलीवूडचे सिनेमेदेखील साइन केले आहेत.
प्रियांका चोप्रा
मलिशा जेव्हा केवळ पाच वर्षांची होती तेव्हा तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत ती फॅशन शोमध्ये रॅम्पवर थिरकली होती.
हॉलीवूडच्या ऑफर
आज मलिशा सोशल मीडिया इन्फ्लुअरच नाही तर तिच्याकडे दोन हॉलीवूडच्या ऑफर आहेत.
इन्स्टाग्राम
मलिशा खारवा हिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २५ हजार फॉलोव्हर्स आहेत. तिने अनेक मॉडेलिंग असाइनमेंट केल्या आहेत.