लुटीच्या उद्देशाने हल्ला; आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 10:51 IST2024-02-12T10:50:24+5:302024-02-12T10:51:25+5:30

आरोपीविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल.

assault with intent to rob the accused was shackled in mumbai | लुटीच्या उद्देशाने हल्ला; आरोपीला ठोकल्या बेड्या

लुटीच्या उद्देशाने हल्ला; आरोपीला ठोकल्या बेड्या

मुंबई : लुटीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चोरट्याला पायधुनी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत अटक केली आहे. आसीफ एहसानउल्ला खान असे आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्जीद बंदर रेल्वेस्थानक येथून पायी जात असलेल्या ५२ वर्षीय तपन मन्ना यांच्यावर तीन आरोपींनी धारधार शास्त्राने सपासप वार करून त्यांच्याजवळील रोख रकमेने भरलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी दि. २२ डिसेंबरच्या सायंकाळी पावणेसात वाजता ही घटना घडली होती. लुटारूंनी केलेल्या हल्ल्यात मन्ना हे गंभीर जखमी झाले होते. 

भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल :

  मन्ना यांच्या पत्नीची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करून पायधुनी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. 

  आरोपी खान हा पोलिसांना सापडत नव्हता.आरोपी खान हा उत्तर प्रदेशमधील गाजीयाबाद येथे असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. 

  पायधुनी पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जात खान याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस अभिलेखवरील सराईत गुन्हेगार असलेल्या खान विरोधात ताडदेव आणि भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

Read in English

Web Title: assault with intent to rob the accused was shackled in mumbai