Join us

हप्ता नाकारल्याने केला जीवघेणा हल्ला; पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:27 IST

तक्रारदार इम्रान खान (३२) हे पवई परिसरातील एका साइटवर सुपरव्हायझर आहेत. तीन दिवसांपूर्वी आरोपी लालू हा या ठिकाणी येऊन प्रशांत शर्मा कुठे आहे तसेच हे काम कोणाचे आहे, अशी विचारणा करत होता. त्यावर हे काम शर्माचे असून, ते स्वतःच करत आहेत, असे इम्रान यांनी त्याला सांगितले.

मुंबई : हप्ता नाकारल्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार पवई पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी मुबारक उर्फ लालू खान नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

तक्रारदार इम्रान खान (३२) हे पवई परिसरातील एका साइटवर सुपरव्हायझर आहेत. तीन दिवसांपूर्वी आरोपी लालू हा या ठिकाणी येऊन प्रशांत शर्मा कुठे आहे तसेच हे काम कोणाचे आहे, अशी विचारणा करत होता. त्यावर हे काम शर्माचे असून, ते स्वतःच करत आहेत, असे इम्रान यांनी त्याला सांगितले. तेव्हा शर्माने आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही त्यांची विकेट पाडू, अशी धमकी लालूने दिली. हप्ता नाकारल्याने लालू तक्रारदाराला शिवीगाळ करू लागला. त्याने खिशातील चाकू काढत आधी इम्रानचा मित्र जावेद यांच्यावर हल्ला केला. त्यांनी तो हल्ला चुकवला तेव्हा लालूने इम्रानवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

तो वार चुकवण्यासाठी खाली वाकल्याने इम्रानच्या गालाला चाकू लागून रक्त येऊ लागले. तेव्हा जावेदने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनाही लालू हा चाकू दाखवून धमकावू लागला. तिथून तो मोरारजी नगरच्या दिशेने गेला आणि पोलिसांत तक्रार केल्यास तुम्हाला सोडणार नाही अशी धमकीही त्याने दिली. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस