Join us

पार्टी बदलताच डाग धुऊन झाले स्वच्छ; सोशल मीडियात 'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 08:21 IST

साेशल मीडियावर निवडणुकीचा चढला रंग

लाेकसभा निवडणुकीची घाेषणा झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अगदी रात्री झाेपेपर्यंत एका पक्षाचा प्रचार करणारे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात गेल्याचे पाहायला मिळाले. पक्षांतर केलेल्या अनेक जणांना लाेकसभेची उमेदवारीही मिळाली. अशा नेत्यांबाबत साेशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे. 

आता नंबर काेणाचा?काॅंग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या काॅंग्रेसला साेडचिठ्ठी देण्यावरूनही साेशल मीडियावर अनेक पाेस्ट व्हायरल झाल्या आहेत.पक्षांतर करताच निरूपम यांनी काॅंग्रेसवर टीकास्त्र साेडले. त्यांच्याबाबत युझर्स म्हणत आहेत, दरराेज काॅंग्रेसमधून चांगले नेते बाहेर पडत आहेत.

काय उत्तर देणार?काॅंग्रेसचे प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत साेशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आता ते भाजपचे गुणगान गातील, अशा काॅमेंट्स केल्या जात आहेत. 

दीदी आणि विषारी सापnपंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पश्चिम बंगाल दाैऱ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानताना ‘दीदी’ असा उल्लेख केला.nतर ममता यांनी बिहारमध्ये एका भाषणादरम्यान भाजपसाठी ‘विषारी साप’ यासारख्या शब्दांचा वापर केला. साेशल मीडियावर यावरुन जाेरदार मिमयुद्ध पाहायला मिळाले. अशा शब्दांना दाेन्ही बाजुच्या समर्थकांनी अपमानजनक म्हटले.

पापा की व्हायरल परी...nकाही दिवसांपासून साेशल मीडियावर एका जाहिरातीवरुन प्रचंड मिम्स व्हायरल झाल्या आहेत. एक तरुणी आपल्या वडिलांसाेबत बाेलताना सांगते, ‘माेदीजी ने वाॅर रुकवा दी पापा...’ हा व्हिडीओ प्रचारासाठी प्रसारित केलेल्या एका जाहिरातीचा भाग हाेता.nत्यावरुन साेशल मीडियावर दाेन्ही बाजुनी फाेटाे एडिट करुन वेगवेगळ्या शीर्षाकासह व्हायरल केले.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४निवडणूकभाजपा