फ्लॅट देण्याच्या बहाण्याने तब्बल ५० लाख उकळले; दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 15:46 IST2023-07-30T15:46:32+5:302023-07-30T15:46:47+5:30
याप्रकरणी डॉ. अजाज छपरा (६२) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने तब्बल ५० लाख उकळले; दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई: चांगला फ्लॅट मिळवून देतो, असे सांगून दोघांनी एका डॉक्टरकडून ४९ लाख ७५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी डॉ. अजाज छपरा (६२) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे पश्चिम येथील झुल्फिकार सय्यद आणि कंत्राटदार आदिल अलाना यांनी आपापसात संगनमत करून डॉ. छपरा यांना फसवले. दुर्गामाता हाऊस इमारतीमधील फ्लॅट क्र.४०२ मिळवून देण्यासाठी दोघांनी ४९ लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. डॉ. छपरा यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मानवी पोलिसात तक्रार केली. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका अधिनियमा अंतर्गत सय्यद आणि अलाना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.