Arsenic is prescribed by thousands of doctors around the world to treat coronary heart disease | कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध

कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध

मुंबई : गेल्या ४० वर्षांपासून मुंबईत कार्यरत असलेले होमिओपॅथी डॉक्टर जवाहर शाह यांनी जगभरातील १०० डॉक्टरांच्या मदतीने होमिओपॅथी औषधांचे किट तयार केले असून, त्याचे आतापर्यंत २२ हजार पोलीस, ४ हजार अग्निशमन दलाचे जवान, धारावी१ राहणारे २ हजार नागरिक; अशा एक लाखांहून अधिक जणांना मोफत वितरण केले आहे. उल्लेखनीय म्हणजे होमिओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होत असून, कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच नवे रुग्णही आढळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतात कोरोनाना हरविण्यासाठी होमिओपॅथीचा वापर केला जात आहे. शाह यांनी जगभरातील १०० डॉक्टरांच्या मदतीने तयार केलेले होमिओपॅथी औषध नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, हे औषध तयार करण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारने कोरोनोसोबत लढण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टरांचे एक पथक मार्गदर्शनासाठी तयार केले आहे. यात डॉ. जवाहर शाह यांचाही समावेश आहे.

एक लाख किट्स मोफत वितरित

महिन्यातून केवळ सहा दिवस हे औषध घ्यायचे आहे. मुंबई पोलिसांना औषधांचे सर्वप्रथम वितरण करण्यात आले. रुग्णालयातील नर्स, फळ विक्रेते, वॉचमन अशा अनेकांना हे औषध देण्यात आले आहे. आतापर्यंत याच्या एक लाख किटचे मोफत वितरित करण्यात आले आहे, असे शाह म्हणाले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Arsenic is prescribed by thousands of doctors around the world to treat coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.