तुम्ही खरेच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहात का?; श्रीकांत शिंदेंच्या साधेपणाने भारावली अम्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:55 IST2023-05-06T09:53:47+5:302023-05-06T09:55:20+5:30

श्रीकांत शिंदेंनी त्या छोट्या टपरीवजा हॉटेलमध्ये बसून मस्त इडली, सांबर, पुरी, चटणीवर ताव मारला आणि शेजारच्याच टपरीवर कॉफी घेतली.

Are you really the chief minister's Son?; Amma was overwhelmed by Srikanth Shinde's simplicity | तुम्ही खरेच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहात का?; श्रीकांत शिंदेंच्या साधेपणाने भारावली अम्मा

तुम्ही खरेच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहात का?; श्रीकांत शिंदेंच्या साधेपणाने भारावली अम्मा

मुंबई : ‘नींगल उन्मयील मुथलवरीन मगना..?’ म्हणजेच तुम्ही खरेच मुख्यमंत्री साहेबांचे चिरंजीव आहात का? खासदार श्रीकांत शिंदेंना हा प्रश्न विचारला तो तामिळनाडूतील तंजावर शहरातील एका इडली टपरीच्या मालकिणीने.

श्रीकांत शिंदे तंजावरला गेले असताना मुथू इडली शॉप या एका लहानशा टपरीवर गेले. श्रीकांत शिंदेबरोबर अंंगरक्षकही होते. तेव्हा टपरीच्या मालकीण असलेल्या अम्माने चौकशी केली असताना एका अंगरक्षकाने ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याचे सांगितले. पण अम्माला सुरुवातीला विश्वास बसला नाही.

श्रीकांत शिंदेंनी त्या छोट्या टपरीवजा हॉटेलमध्ये बसून मस्त इडली, सांबर, पुरी, चटणीवर ताव मारला आणि शेजारच्याच टपरीवर कॉफी घेतली. हे त्या अम्मासाठी आणि आजूबाजूच्या सर्वांसाठी आश्चर्यकारक होते. त्यामुळे श्रीकांत शिंदे बाहेर पडताना तिने पुन्हा तमीळ भाषेत, ‘तुम्ही खरेच मुख्यमंत्री साहेबांचे चिरंजीव आहात का.?’, असा प्रश्न विचारला. शिंदे यांच्यासोबत असलेला तमीळ अंगरक्षक लगेच बोलला ‘हम् .. डॉ. श्रीकांत शिंदे.. एमपी...’ अंगरक्षकाकडून तिला जेव्हा कळले की, ते फक्त मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव नाहीत तर स्वतः खासदारदेखील आहेत, तेव्हा तिच्या डोळ्यात चमक होती.

Web Title: Are you really the chief minister's Son?; Amma was overwhelmed by Srikanth Shinde's simplicity