घराबाहेर पडताय? मग जरा इकडे लक्ष द्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 07:50 IST2025-08-29T07:49:15+5:302025-08-29T07:50:06+5:30

आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा समाजातील आंदोलकांच्या मोर्चामुळे मुंबईतील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. तर अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

Are you leaving the house? Then pay attention here... | घराबाहेर पडताय? मग जरा इकडे लक्ष द्या...

घराबाहेर पडताय? मग जरा इकडे लक्ष द्या...

...हे मार्ग राहणार बंद
वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे
वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉम्बेकडे
छेडानगरवरून फ्रीवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे
व्ही. एन. पुरव मार्गावरून साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे
देवनार फार्म रोड मार्गाकडून पांजरपोळकडे
ट्रॉम्बे चिता कॅम्पकडून व्ही. एन. पुरव मार्गावरून फ्री-वेला व पांजरपोळकडे जाणारा
सायन पनवेल मार्गावरून पांजरपोळकडे येणारा
फ्री-वे उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ जंक्शन येथे खाली उतरणारा
आय. ओ. सी. जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजकडून फ्री-वेवर दक्षिण वाहिनीवर जाणारा
वामन तुकाराम पाटील मार्गावरून पांजरपोळ जंक्शन येथून फ्री-वे उत्तर वाहिनी मार्गिका.

कोणते आहेत पर्यायी रस्ते ?
- वाशीकडून येणाऱ्या सर्व वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रिज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आयओसी जंक्शन व छेडानगर मार्गे, तर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे व फ्रीवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने छेडानगर मार्गाने, तसेच छेडानगरवरून फ्रीवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने उजवे वळण घेऊन अमरमहल, नेहरूनगर ब्रिज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.

-व्ही. एन. पुरव मार्ग दक्षिण वाहिनीवरून पांजरपोळ व पूर्व मुक्त मार्गाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना पंजाबवाडी जंक्शन येथून उजवे वळण घेऊन हेमंत करकरे गॅस पंप येथून गोवंडी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे गावदेवी चौकातून डावे वळण, नीलम जंक्शन उजवे वळण, पुढे मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीतून आय.ओ.सी. जंक्शन डावे वळण घेऊन पुढे मुंबई शहरात प्रवेश करतील.

 सी. जी.  गिडवाणी उत्तर वाहिनीवरून पांजरपोळकडे येणारी सर्व वाहने गोल्फ क्लब येथून डावे वळण घेऊन चिमणी गार्डन येथून सरळ डायमंड गार्डन येथून उजवे वळण घेऊन सायन-ट्रॉम्बे मार्ग उत्तर वाहिनीवरून पुढे पांजरपोळ जंक्शन येथून डावे वळण घेऊन वामन तुकाराम पाटील मार्गाने पुढे मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीतून आय.ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने नवी मुंबईकडे जातील.
पूर्व मुक्त मार्ग उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ टनेलनंतर सर्व प्रकारची वाहने पांजरपोळ फ्लायओव्हरवरून पुढे आय.ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन नवी मुंबईकडे रवाना होतील.

 गोवंडी रेल्वे ब्रिज येशून खाली उतरून नीलम जंक्शन येथे उजवे वळण घेऊन ना.ग. आचार्य मागनि पुढे सुभाषनगर, चेंबूर स्टेशन येथून मुंबईकडे अथवा इतरत्र ज्ञाता येईल.
वामन तुकाराम पाटील मार्गाचरूत पूर्व मुक्त उत्तर बाहिनीकडे जाणारी सर्व वाहने पांजरपोळ जंक्शन येथून उजवे वळण घेऊन मैत्रीपार्क सायन-ट्रॉम्बे रोहडने मुंबईकडे जातील.

 

Web Title: Are you leaving the house? Then pay attention here...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.