शाळेची मनमानी शुल्कवाढ; पालकांची कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:43 AM2020-08-12T04:43:40+5:302020-08-12T04:43:50+5:30

शुल्क नियंत्रण कायदा; शुल्कवाढ केली नसल्याची प्रशासनाची माहिती

Arbitrary increase in school fees; Demand for parental action | शाळेची मनमानी शुल्कवाढ; पालकांची कारवाईची मागणी

शाळेची मनमानी शुल्कवाढ; पालकांची कारवाईची मागणी

Next

मुंबई : कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. या काळात शुल्कवाढ करू नये, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असतानाही अनेक शाळांनी शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र शाळेच्या प्रशासनामार्फत शाळेने कोणतीही शुल्कवाढ केली नसल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईच्या दादर येथील साने गुरुजी शाळेकडून मागील वर्षी एकाच वर्गातील २ विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क आकारणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालक शिक्षक संघाची मान्यता नसतानाही शुल्कवाढ करण्यात आली आहे. या कारणामुळे पालक शिक्षण विभागाकडून शाळेवर कडक कारवाईची मागणी करत आहेत.

शुल्कवाढीच्या विषयांत पालक शिक्षक संघाला विश्वासात घेऊनच शुल्कासंबंधित काहीही निर्णय घ्यावेत ते स्पष्ट निर्देश आले आहेत. असे असताना शाळा मात्र या नियमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र या प्रकरणावरून दिसून येत आहे. शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेबाबत भयावह परिस्थिती असताना व शुल्कवाढीबाबत सातत्याने पालक, शाळा प्रशासन यांच्यात वादंग निर्माण होत आहेत.राज्यात कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे आणि कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पालक आणि शिक्षक समितीने वाढीव शुल्काचा प्रस्ताव बैठकीत नाकारला होता. यासंदर्भात शाळेचे संस्थाचालक मोहन मोहाडीकर यांचंही संपर्क केला असता शाळेची कोणतीही शुल्कवाढ केली नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र पालकांना दिलासा देण्यासाठी येत्या २ ते ३ दिवसांत पुन्हा पालकांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेकायदा शुल्क वसुली बंद करा
एका शाळेत केवळ एकच शिक्षक-पालक समिती स्थापन करण्याची परवानगी असते. त्यामुळे शाळेने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ याचे उल्लंघन केले आहे. शिक्षण विभागाने शाळेचे शुल्क आॅडिट करायला हवे ही आमची पहिली मागणी आहे. बेकायदा शुल्क वसुली बंद करून योग्य ते आदेश शाळेला द्यायला लावावेत.
- प्रसाद तुळसकर,
कार्यकर्ते, पालक शिक्षक संघटना

Web Title: Arbitrary increase in school fees; Demand for parental action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा