२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 07:00 IST2023-11-12T06:59:18+5:302023-11-12T07:00:03+5:30

यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पेडणेकर यांना समन्स जारी करण्यात आले होते.

Appear for inquiry on November 23; ED summons Kishori Pednekar again | २३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

२३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

मुंबई : कोरोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा समन्स जारी केले असून आता २३ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी पेडणेकर यांना समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्या ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.

कोरोनातील घोटाळा

आपल्या वकिलाला ईडीच्या कार्यालयात पाठवले होते व या प्रकरणाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपल्याला चार आठवड्यांचा कालावधी हवा असल्याची मागणी केली होती. याच प्रकरणात ७ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. त्यावेळी त्यांनी कोविडकाळात मुंबई महापालिकेने बॉडी बॅग्जची खरेदी वाढीव दराने केल्याचा आरोप आहे. 

Web Title: Appear for inquiry on November 23; ED summons Kishori Pednekar again