आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 02:30 IST2020-09-17T02:30:15+5:302020-09-17T02:30:41+5:30
तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मला काही त्रास नसून मी ठीक आहे.

आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वत: आझमी यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मला काही त्रास नसून मी ठीक आहे. मात्र, चार दिवसांत जे लोक मला भेटायला आले त्या सर्वांनी सावधगिरी बाळगावी. आवश्यक तपासण्या, वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आझमी यांनी केले.