अॅपआधारित वाहन चालकांचे आंदोलन; राज्य सरकारने ठरवून दिलेले भाडे लागू न केल्याने आझाद मैदानात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:18 IST2025-10-01T09:17:42+5:302025-10-01T09:18:03+5:30
अॅपआधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाने ठरवून दिलेले भाडे अॅपवर दाखवत नसल्याने त्यांच्याविरोधात चालकांनी मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले.

अॅपआधारित वाहन चालकांचे आंदोलन; राज्य सरकारने ठरवून दिलेले भाडे लागू न केल्याने आझाद मैदानात निदर्शने
मुंबई : अॅपआधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाने ठरवून दिलेले भाडे अॅपवर दाखवत नसल्याने त्यांच्याविरोधात चालकांनी मंगळवारी आझाद मैदानातआंदोलन केले. दरम्यान, आमच्या हक्काचे पैसे बुडवणाऱ्या कंपनीवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीला परवानगी दिली असताना केवळ पेट्रोलची बाइक टॅक्सी सुरू असल्याने ती तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरटीओने दिले होते. असे असताना कंपनीकडून केवळ ११ रुपयांप्रमाणे भाडे आकारण्यात येत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, धनाढ्य कंपन्यांकडून एक रुपयाचासुद्धा दंड वसूल करण्याची परिवहन विभागाची हिंमत नाही, अशी टीका भारतीय कामगार गीग मंचचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी केली आहे.
बदनामी कराल, तर कारवाई करू
परिवहन विभागाची बदनामी होणार नाही, याची दक्षता चालकांनी घ्यावी व शहरातील बदनामीकारक फलक काढून टाकावेत, तसेच अशी बदनामी होत राहिल्यास आपल्या संघटनेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणचे सचिव भारत कळसकर यांनी दिला आहे.