Cylinder Blast in Worli : आनंद पुरी (२७) याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वरळी गॅस सिलिंडर स्फोटात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
वरळीतल्या कामगार वसाहतीमधील एका घरात सिलिंडर स्फोटात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी जखमी झालेल्या मंगेश पुरी या चार महिन्यांच्या बाळाचा ३० नोव्हेंबर रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर उर्वरित तीन जखमीपैकी आनंद पुरी यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते असून, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आनंद पुरी (२७) याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वरळीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर चार जखमींना नायर रुग्णालयात हलविले होते. जखमींपैकी विद्या पुरी (२५) आणि पाच वर्षांचा मुलगा विष्णू पुरी यांना नायर रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. विद्या पुरी या ५० ते ६० टक्के आणि विष्णू हा १५ ते २० टक्के भाजला आहे. या दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या डॉ. हर्षद यांनी दिली आहे.
Web Title: Another dies during treatment in Worli gas cylinder blast