कंगनाविरोधात आणखी एक तक्रार; प्रतिबंध कायद्याच्या कलम २ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:35 IST2021-11-25T12:30:08+5:302021-11-25T12:35:01+5:30
पोलिसांनी कारवाई न करता न्यायालयात जाण्यास सांगितले, असे परमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कंगनाविरोधात आणखी एक तक्रार; प्रतिबंध कायद्याच्या कलम २ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगनाविरोधात आणखी एक खासगी तक्रार दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यसंघर्षाबाबत आणि शीख समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यांची न्यायालयीन दखल घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युसूफ परमार यांनी दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार केली आहे.
कंगनावर भारतीय दंडसंहिता कलम १२४ (ए) (देशद्रोह) आणि ५०४ (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान) प्रतिबंध कायद्याच्या कलम २ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परमार यांनी केली आहे. कंगना हिने स्वातंत्र्यसैनिकांची विटंबना केली आहे. याबाबत मालाड पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी कारवाई न करता न्यायालयात जाण्यास सांगितले, असे परमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.