मुंबई : कोस्टल रोडवर अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी टॅक्सी आणि कारची धडक झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी संध्याकाळी दोन कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले असून याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील रहिवासी असलेले चालक विनोद कुमार उपाध्याय (५३) हे त्यांचे मालक ताजुद्दीन यांना घेऊन कारने मरिन ड्राइव्हहून वांद्र्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या स्विफ्ट कारचालक विवेक रामबाब सैनिक (२०) याने समोरील कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कारने ताजुद्दीन यांच्या कारला धडक दिली. या धडकेत चालक उपाध्याय यांच्या हाताला दुखापत झाली, तर स्विफ्ट कारमधील प्रवासी अलोक मिश्रा (१९) जखमी झाला. दोघांवरही प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने अपघातात मोठी जीवितहानी टळली असून याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : Two cars collided on Mumbai's Coastal Road, injuring two people. A Swift car attempting to overtake another vehicle lost control and crashed. Minor injuries were reported; police are investigating.
Web Summary : मुंबई के कोस्टल रोड पर दो कारों की टक्कर में दो लोग घायल हो गए। एक स्विफ्ट कार दूसरी गाड़ी को ओवरटेक करते समय नियंत्रण खो बैठी और दुर्घटनाग्रस्त हो गई। मामूली चोटें आई हैं; पुलिस जांच कर रही है।