Join us  

आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:32 AM

राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आणखी २६७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या मंडळांमधील जवळपास ५ हजार गावांमधील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई  - राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आणखी २६७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या मंडळांमधील जवळपास ५ हजार गावांमधील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१५१ तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्तांना केंद्र सरकारच्या निधीतून तर २६७ मंडळांमधील शेतकºयांना राज्याच्या तिजोरीतून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे १७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.दुष्काळ जाहीर करण्यात आलेले मंडळ :नाशिक : कळवण, नवीबेज, मोकभांगी, दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाड, रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूर, नगरसूल, अंदरसूल, पातोडा, सावरगाव, जळगाव.धुळे : म्हसदी, निजामपूर, पिंपळनेर.नंदुरबार : अक्कलकुवा, खापर, मुरांबा.जळगाव : कासोदा, उंत्रगगृह, सोनवड.अहमदनगर : दहीगाव, बेलापूर.पुणे : थेऊर, नारायणगाव, वडगाव, निमुलगाव, बेल्हा, ओटूर. चाकण, आळंदी, पिंपळगाव, कान्हेरसर.सोलापूर : शेळगी, तिºहे, मार्डी, वडाला, आगळगाव, वैराग, उपालेडू, गौडगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, खांडवी.सातारा : नागठाणे, वडुथ, तासगाव, अपशिंगे, आनेवाडी, कुडाळ, चाफळ, तराळे, मल्हारपेठ, तळमावले, इंदोली, कवठे, वडूज, वाठार, लोणंद, पाचवड, भुईज, ओझर्डे, सुरूर.सांगली : आरग, वाळवा, पेठ, कासेगाव, आष्टा, इस्लामपूर, कामेरी, भिलवडी, पलूस, नेवारी.कोल्हापूर : हातकणंगले, कबनूर, हेर्ले, हुपरी, रूई, वडगाव, वाठार, इचलकरंजी, नृसिंहवाडी, नंदाणी, पन्हाळा, कोडोली, मुडशिंगी, इसपुर्ली, कानेरी, दुंडागे, हलकरणी, कसबा, कुर.जालना : तळणी, पांगरी. लातूर जिल्हा : लातूर, बाभूळगाव, हरंगुळ, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, औसा, लामजना, मातोळा,भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी, अहमदपूर, खंडाळी, आंदोरो, शिरुर, हाडोळती, पानचिंचोली, औराद, अंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी, उदगी, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी, पोहरेगाव, कारेपूर,देवणी, बोरोळ, वलांडी, जळकोट, घोणसी.नांदेड जिल्हा : बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर, लोहा, मनाठा, इस्लापूर, जलधरा, शिवणी, करखेली, जारीकोट, कुंटूर, नरसी, मांजरम.परभणी : माहातपुरी, माखणी, राणीसावरगाव, जिंतूर, बोरी, आडगाव, चारठाणा, लिमला.हिंगोली : गिरगाव, टेंभुर्णी.बुलडाणा : पिंपळगाव काळे, वडशिंगी, आसलगाव, एकलारा, कोलारा, धोडप, पेठ, शेलगाव, आटोळ, चांधई, साकळी, म्हसाळा, देऊळगाव राजा, तुळजापूर, मेहुण राजा, अंढेरा, जानेफळ, शेलगाव देशमुख, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, नायगाव, दत्तपूर.अकोला : आसेगाव.वाशिम : जऊळका, उमरी.अमरावती : शिराळा, नांदगाव, पुर्णानगर, आष्टी, आसरा, आमला, कुºहा, दारापूर, सामदा, थिलोरी, करजगाव, आसेगाव, तळेगाव, शिरसगाव, चिंचोली, अंजनसिंगी.यवतमाळ : शिरजगाव, मोझर, गौल, बेलोरा, शिरोली, शिवणी, घोटी.वर्धा : आर्वी, वाठोडा, वाधोणा, खरांगणा, विरूळ, रोहणा, आंजी, वायगाव, झडशी, विजयगोपाल, भिडी, आंदोरी, अलीपूर, जाम, गिरड, कोरा, वायगाव, कांढळी, मांडगाव.नागपूर : गोधणी, आडेगाव, टाकळघाट, देवलापार, मकरधोकडा, हेवंती, पाचगाव, मांढळ,भंडारा : नाकडोंगरी, आमगाव.गोंदिया : खामरी, मुल्ला, नवेगावबांध.चंद्रपूर : चिखली, ढाबा, माढेळी, टेमुर्डा, शेगाव, खांबाडा, चिकणी, नंदोरी, चंदनखेडा, मुधोली, मांगली, घोडपेठ, पोंभुर्णा.दुष्काळग्रस्तांना मिळणा-या सवलतीदुष्काळग्रस्त मंडळातील शेतकºयांना अर्थसाहाय्यदेण्याबरोबरच खालील सवलती लागू करण्यात आल्या आहेत.१) जमीन महसुलात सूट २) सहकारी कर्जाचे पुनर्गठन ३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती ४) कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट ५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता ७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर ८) टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे.

टॅग्स :दुष्काळमहाराष्ट्र सरकार