आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:08 PM2020-05-23T20:08:43+5:302020-05-23T20:09:20+5:30

रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी  श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत.

Another 2,600 workers will run special trains, 36 lakh workers will travel MMG | आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार

आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार

Next

मुंबई : लॉकडाऊन काळात देशभरात अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू आहेत. देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांची संख्या अधिक असल्याने आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष  ट्रेन पुढील १० दिवसात चालविण्याचा  निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे ३६ लाख मजुरांना घरी जाता येणार आहे. 
           
रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी  श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत. एका ट्रेनमधून १ हजार ५००   ते १ हजार ७०० मजुरांना पाठविण्यात येते. मात्र, मजुरांची संख्या अधिक असल्याने श्रमिक ट्रेन वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार पुढील १० दिवसात २ हजार ६००  श्रमिक विशेष  ट्रेन चालविण्यात येणार आहे. त्याआधारे ३६ लाख मजुरांना प्रवास करता येईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. मागील २३ दिवसात रेल्वेने २ हजार ६०० श्रमिक ट्रेनद्वारे ३६ लाख मजुरांना सुखरुप त्यांच्या मूळ गावी पोहोचविले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. 
 

Web Title: Another 2,600 workers will run special trains, 36 lakh workers will travel MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.