विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर; १८ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 01:27 AM2020-07-22T01:27:50+5:302020-07-22T06:36:36+5:30

आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांचा समावेश

Announcing the schedule of first year degree courses of the university | विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर; १८ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू

विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर; १८ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल केले आहेत.१८ जुलैपासून मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे.

नोंदणी करताना काही अडचणी आल्यास ०२०-६६८३४८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रक्रियेचा अवलंब करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून तेथील विद्यार्थी ऑफलाइन प्रक्रिया राबवू शकतात.

जर एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्याने त्याच्या नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने या वर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आॅनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रवेशपूर्व आॅनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला पीआरएन नंबरही लवकरच दिला जाणार आहे. अर्ज भरताना सर्व अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांकडे असल्यामुळे हॉलतिकीट आणि गुणपत्रिका आॅनलाइन माध्यमातून विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अशी असेल प्रक्रिया
अर्ज विक्री - २४ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२०-
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया - २२ जुलै ते ०४ ऑगस्ट, २०२० (१.०० वाजेपर्यंत)
प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख - २७ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२० (३.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक)
पहिली गुणवत्ता यादी- ४ ऑगस्ट( सायंकाळी ७.०० वाजता)-
दुसरी गुणवत्ता यादी - १० ऑगस्ट ( सायं. ७.०० वा.)-
तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट (सायं. ७.०० वा.)

Web Title: Announcing the schedule of first year degree courses of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.