Join us
Daily Top 2Weekly Top 5

जामीन होऊनही अनिल देशमुखांचा मुक्काम कारागृहातच; हायकोर्टाने जामीनावरील स्थगिती वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:09 IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका हायकोर्टाने दिले आहे.  अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थिगिती हायकोर्टाने वाढवली आहे.

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका हायकोर्टाने दिले आहे.  अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थिगिती हायकोर्टाने वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. सुरुवातील 10 दिवसांनी हा मुक्काम वाढवला होता. 

जामीनाला दिलेली स्थिगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली होती. सर्वाच्च न्यायालय हे नाताळनिमित्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद आहे, त्यामुळे सुनावणी होत नाही. त्यामुळे आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी साबीआयने केली होती. यावर हायकोर्टाने आणखी 10 दिवस वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांचा मुक्काम पुन्हा वाढला आहे. 

Sanjay Raut : "बोम्मई रोज उठून कानफटीत मारतात अन् आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात"

न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली. मात्र, न्यायालयाने स्वत:च्याच आदेशावर १० दिवस स्थगिती दिली. शुक्रवारी सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सुनावणी जानेवारी २०२३ मध्ये ठेवली. सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायालय बसत नसल्याने जानेवारीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती ३ जानेवारीपर्यंत कायम करावी. देशमुख यांच्यातर्फे ॲड. अनिकेत निकम यांनी आक्षेप घेतला. त्यावर न्यायालयाने सिंग यांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. 

पालांडेंचा जामीन मंजूर 

अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी  जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्या. एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. पालांडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात न आल्याने ते बुधवारपर्यंत कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. ईडीने जामिनाच्या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली.

टॅग्स :अनिल देशमुखन्यायालयराष्ट्रवादी काँग्रेस