वकिलाकडून ८० लाख उकळण्याचा प्रयत्न फसला! तोतया पोलिसाकडून पोलिसी कारवाईची भीती

By गौरी टेंबकर | Published: March 26, 2024 04:36 PM2024-03-26T16:36:27+5:302024-03-26T16:36:43+5:30

तक्रारदार या वांद्रे पश्चिमच्या रिजन पार्क या ठिकाणी राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २५ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करत तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावाचे एक पार्सल असून ते इराण येथे आरमान मलिक नावाच्या इसमाला कुरिअर केले आहे.

An attempt to extort 80 lakh from the lawyer failed! Fear of police action from fake police | वकिलाकडून ८० लाख उकळण्याचा प्रयत्न फसला! तोतया पोलिसाकडून पोलिसी कारवाईची भीती

वकिलाकडून ८० लाख उकळण्याचा प्रयत्न फसला! तोतया पोलिसाकडून पोलिसी कारवाईची भीती

मुंबई: बनावट पोलीस ओळखपत्राच्या आधारे एका ३० वर्षीय महिला वकिलाला ८० लाखांचा चुना लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या वेळीच सावध झाल्यामुळे हा प्रकार टळला. दरम्यान याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात अनोळखी भामट्यांच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार या वांद्रे पश्चिमच्या रिजन पार्क या ठिकाणी राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २५ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करत तो फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावाचे एक पार्सल असून ते इराण येथे आरमान मलिक नावाच्या इसमाला कुरिअर केले आहे. ज्यात दोन किलो कपडे, पाच एक्सपायर पासवर्ड, तीन क्रेडिट कार्ड, एसबीआय बँकेचे डेबिट कार्ड आणि ५० एल सी डी स्ट्रिप असल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध एफआयआरही रजिस्टर झाल्याचे तो म्हणाला. मात्र सदर पार्सल मी पाठवले नाही असे वकिलाने सांगितल्यानंतर कॉलर ने हेड कॉर्टर सायबर क्राईम यांना कॉल ट्रान्सफर केल्याचे म्हणत तपास अधिकारी पोलीस यांच्याशी कथितपणे बोलणे करायला लावले.

सदर अधिकाऱ्याने वकिलाकडून स्काइप ॲप डाऊनलोड करवत त्यानंतर मुंबई पोलिसाचे आयडी कार्ड पाठवले. तुमची आयडेंटिटी झाली असून एफआयआर रद्द करायचा असल्यास तुमचे वैयक्तिक ओळखपत्र म्हणून फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट डिटेल्स पाठवायला सांगितले. ही सगळी माहिती पाठवल्यावर वकिलाला एक एग्रीमेंट पाठवण्यात आले ज्यातील माहिती कोणालाही शेअर करू नका असे सांगत ८० लाख रुपये त्याच्या खात्यात पाठवायला सांगितले. भामट्याने २६ मार्च रोजी सदर रक्कम डिपॉझिट करायला सांगितली होती मात्र वकिलाला संशय आल्याने त्यांनी या विरोधात वांद्रे पोलिसात धाव घेतली.

Web Title: An attempt to extort 80 lakh from the lawyer failed! Fear of police action from fake police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.