न्यू यॉर्कच्या भारत महोत्सवात अमृता फडणवीस यांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 10:06 IST2023-09-07T10:05:07+5:302023-09-07T10:06:11+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Amruta Fadnavis felicitated at Bharat Mahotsav in New York | न्यू यॉर्कच्या भारत महोत्सवात अमृता फडणवीस यांचा सत्कार

न्यू यॉर्कच्या भारत महोत्सवात अमृता फडणवीस यांचा सत्कार

मुंबई: न्यू यॉर्कमधील जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये आयोजित भारत महोत्सवात प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांचा तेथील महापौरांनी अष्टपैलू कामगिरीसाठी सत्कार केला. एक बँकर असलेल्या अमृता या गायन क्षेत्राबरोबरच सामाजिक सेवा, महिला सबलीकरण क्षेत्रातही आघाडीवर असल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू यॉर्कमधील भारताचे कौन्सुल जनरल रणधीर जयस्वाल प्रमुख पाहुणे होते. विशेष पाहुणे म्हणून अमृता फडणवीस उपउच्चायुक्त दिलीप चौहान उपस्थित होते. 

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत यावेळी अमृता फडणवीस यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद मिळाला. याशिवाय ऑगस्टच्या अखेरीस दोन कार्यक्रमांचे आयोजन चंद्रयान मोहिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी न्यू यॉर्कमध्ये करण्यात आले. यावेळी अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नऊ वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला.

Web Title: Amruta Fadnavis felicitated at Bharat Mahotsav in New York