'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 23:25 IST2025-12-14T23:24:37+5:302025-12-14T23:25:02+5:30
Amruta Fadnavis with Lionel Messi in Mumbai: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीने लावली हजेरी

'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
Amruta Fadnavis with Lionel Messi in Mumbai: स्टार फुटबॉलर आणि फिफा विश्वचषक विजेता अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याचा सध्या भारत दौरा सुरु आहे. रविवारी संध्याकाळी मेस्सीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजेरी लावली. त्याची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या 'प्रोजेक्ट महादेवा' हा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम अधिकृतपणे लाँच केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लिओनेल मेस्सीची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटो काढला.
अमृता फडणवीसांची खास पोस्ट
मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी आज वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली आणि सर्वोत्तम फुटबॉलरपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीसोबत खास फोटो काढला. मेस्सीसोबत काही क्षणांची भेटही चाहत्यांसाठी खूप मोलाची होती. अमृता फडणवीस यांनीही चाहता म्हणून मेस्सीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्याच्यासोबत छानसा सेल्फी घेऊन अपलोड केला. या सेल्फी पोस्टसोबत त्यांनी एक कॅप्शनही दिले. महान फुटबॉलपटूसोबत एक क्षण... मेस्सी मुंबईत... GOAT... सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू!!! असे लिहित अमृता फडणवीस यांनी खास पोस्ट शेअर केली.
A moment with legend #MessiInMumbai …. The Greatest of All Times !!! #GOATTourIndiapic.twitter.com/IMQA3re2ul
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 14, 2025
काय आहे प्रोजेक्ट महादेवा?
महाराष्ट्रभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून निवडलेले १३ वर्षांखालील ६० प्रतिभावान फुटबॉलपटू यांना लिओनेल मेस्सी सोबत ४५ मिनिटांचे विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन सत्र मिळाले. ही संधी या खेळाडूंसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. आजचा कार्यक्रम प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ आणि निवड केलेल्या U-13 फुटबॉलपटूंसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा होता. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहल भेके, तसेच काही सेलिब्रिटीही उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीसांचं मेस्सीला 'प्रॉमिस'
नमस्कार मुंबई, गणपती बाप्पा मोरया... फुटबॉलमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू मेस्सी यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, तो आमच्या ६० युवा फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करत आहे, जे २०३४ मध्ये फुटबॉलच्या मैदानावर आपले वर्चस्व गाजवणार आहेत. 'प्रोजेक्ट महादेवा'चा उद्देश आपल्या राज्यात फुटबॉलला केंद्रस्थानी आणणे हा आहे. आमच्या तरुण उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केल्याबद्दल मेस्सी यांचे खूप खूप आभार. मेस्सी, तुम्ही त्यांना प्रेरणा दिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की, या खेळाडूंपैकी एकतरी खेळाडू फिफा विश्वचषकात खेळताना तुम्हाला नक्कीच दिसेल. धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वागत," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेस्सीसमोर बोलताना व्यक्त केला.