Join us

अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाकडून उ. प. मुंबईतून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 06:19 IST

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू असतानाच ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा व अंधेरी पश्चिम येथील चार विधानसभा क्षेत्रांतील चार शिवसेना शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली. जोगेश्वरी पूर्व विधानसभेत झालेल्या या भेटीच्या वेळी  शिवसेना नेते व विभागप्रमुख ॲड. अनिल परब, शिवसेना नेते व विभागप्रमुख सुनील प्रभू, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रश्मी ठाकरे तसेच शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४शिवसेनाउद्धव ठाकरे