अमिताभच्या अग्निपथच्या डायलॉगने हात धुण्याबाबत केली जनजागृती, मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल
By पूनम अपराज | Updated: February 24, 2021 13:51 IST2021-02-24T13:38:54+5:302021-02-24T13:51:17+5:30
Mumbai Police's tweet goes viral : पुन्हा एकदा असा गंभीर संदेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील डायलॉगची मदत घेतली आहे.

अमिताभच्या अग्निपथच्या डायलॉगने हात धुण्याबाबत केली जनजागृती, मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल
ठळक मुद्देयावेळी मुंबई पोलिसांनी १९९० च्या ‘अग्निपथ’ चित्रपटाची एका डायलॉगची क्लिप शेअर केली आहे,
सोशल मीडियावर लोकांना जाणीव करून देण्याची मुंबईपोलिसांची पद्धत अत्यंत मनोरंजक आहे. गंभीर संदेश हलक्याफुलक्या व्हिडिओंद्वारे लोकांना दिले जातात. पुन्हा एकदा असा गंभीर संदेश देण्यासाठी मुंबईपोलिसांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील डायलॉगची मदत घेतली आहे.
Kya aapne kabhi jaanane ki koshish ki, ki Ma ko kya pasand hai?#PathToSafety#MaKiSuno#MomsAlwaysRight#TakingOnCoronapic.twitter.com/prIxyiQJSN
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 21, 2021
यावेळी मुंबई पोलिसांनीट्विटर आणि इंस्टाग्रामवर १९९० च्या ‘अग्निपथ’ चित्रपटाची एका डायलॉगची क्लिप शेअर केली आहे, त्यात अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्रीरोहिणी हट्टंगडी आणि नीलम कोठारी दिसत आहेत. ते रात्री जेवणाच्या टेबलावर बसून संभाषण करीत होते, जेव्हा अमिताभ बच्चनची आई आपले हात धुण्यास सांगत असे आणि मग अमिताभ बच्चन म्हणायचे, "हात धुण्यात काय जातं, मी आता हात धुतो."