अमित शहा मुंबईत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 01:38 IST2018-07-29T01:38:24+5:302018-07-29T01:38:38+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकींना शनिवारपासून येथे सुरुवात झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्याच दिवशी बैठकीला हजेरी लावली.

 Amit Shah in Mumbai; Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh | अमित शहा मुंबईत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक

अमित शहा मुंबईत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकींना शनिवारपासून येथे सुरुवात झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्याच दिवशी बैठकीला हजेरी लावली. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.
अमित शहा हे सहा दिवसांपूर्वीच मुंबईत भाजपाच्या बैठकीसाठी मुंबईत आले होते. आज ते समन्वय समिती बैठकीच्या निमित्ताने संघ कार्यालयात गेले. सायंकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली. भेटीदरम्यान शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अर्धा तास चर्चादेखील केली. चर्चेदरम्यान, मराठा आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली, असे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका चरित्रपटाच्या प्रिमियर शोस अमित शहा उपस्थित होते.

Web Title:  Amit Shah in Mumbai; Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh