Photo Story :अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडेचा साखरपुडा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 14:35 IST2017-12-11T13:44:27+5:302017-12-11T14:35:57+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा सोमवारी सकाळी साखरपुडा संपन्न झाला.

Photo Story :अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडेचा साखरपुडा संपन्न
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचा सोमवारी सकाळी साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे लवकरच मिताली बोरुडेबरोबर विवाहबद्ध होणार आहेत. महालक्ष्मी रेस कोर्सच्या टर्फ क्लबवर अमित आणि मितालीचा साखरपुडा पार पडला. शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी साध्या पद्धतीने साखरपुडा होईल अशी चर्चा होती.
अमित आणि मिताली यांची मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाल्यानंतर आज त्यांचा साखरपुडा झाला. पेशाने फॅशन डिझायनर असलेली मिताली प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरुडे यांची कन्या आहे. अमित यांचे शिक्षण पोद्दार महाविद्यालयातून तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातून झाले आहे.
आज राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस आहे. त्यामुळे याच दिवशी साखरपुडयाचा निर्णय घेतला. अमित ठाकरे हे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार आहे. अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले नसले तरी मनसेच्या बहुतांश पोस्टरवर आता त्यांचा फोटो झळकतो. राज यांच्या सभांना त्यांची हजेरी असते.